शिरवळ गावाच्या पश्चिमेला नीरा नदीच्या काठावर श्रीरामेश्वराचे मंदिर आहे.मंदिर नदीच्या पात्रापासून दूर व उंचावर आहे.त्याच्या समोर नदीच्या पात्रात गर्गेश्वराचे मंदिर आहे.
रामेश्वराचे मंदिर हेमाडपंथी आणि कमानी असलेले मोठे टुमदार आहे.मंदिराची स्वच्छता ठेवून नित्यनेमाने पुजाअर्चा केली जाते.बाजूला बागबगीचा तयार केला आहे.पाणी नसेल तेव्हा मोकळ्या हवेत फिरण्यासाठी अगदी उत्तम असे हे ठिकाण आहे.पावसाळ्यात नदीपात्रात अमाप पाणी असते आणि हा सारा परिसर प्रचंड खाडीसारखा दिसतो.रामेश्वरापासून सूर्योदय अतिशय छान दिसतो.पूर्वेला सुभानमंगळाचे अवशेष दिसतात.जवळच गावातील स्मशान आहे.